तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
agniveervayu bharti 2026 (Indian Air Force) अंतर्गत अग्निवीरवायु पदाची भरती
१२ वी पास
देशसेवेची आवड असणाऱ्या आणि आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या सर्व तरुण मित्र-मैत्रिणींसाठी एक नंबर कडक संधी आली आहे! भारतीय वायु सेना Indian Air Force अंतर्गत अग्नीवीरवायू Agniveervayu Intake 02/2027 पदांसाठी नवीन मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे यामध्ये अविवाहित मुले आणि मुली दोघेही अर्ज करू शकतात! जर तुमचे वय आणि शिक्षण या अटींमध्ये बसत असेल, तर देशाची सेवा करण्याची ही सुवर्णसंधी अजिबात सोडू नका . या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगाराचे पॅकेज आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, याचा संपूर्ण सोपा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे. शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच संपूर्ण माहिती वाचा आणि त्वरित अर्ज करा ! अर्जदार हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 26 जुलै 2026 आहे तरी पत्रधारक उमेदवाराने अंतिम मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्या
| विभाग / संस्था | १२ वी पास |
| एकूण पद संख्या | (एकूण पदे प्रसिध्द केलेले नाही) |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 26 जुलै 2026 |
| वयोमर्यादा तपशील | उमेदवाराचा जन्म ०१ जुलै २००५ ते ०१ जानेवारी २०१० या दोन्ही तारखांच्या दरम्यान झालेला असावा (या दोन्ही तारखा धरून). भरतीचे सर्व टप्पे पार पाडून अंतिम निवडीच्या वेळी उमेदवाराचे कमाल वय २२ वर्षे असावे. |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.] |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता | उंची (Height): मुले आणि मुली दोघांसाठी किमान उंची १५२ सेमी असणे आवश्यक आहे. (उत्तराखंडमधील डोंगरी भाग आणि ईशान्येकडील राज्यांतील मुलींसाठी १४७ सेमी, तर लक्षद्वीपच्या उमेदवारांसाठी १५० सेमी उंची ग्राह्य धरली जाईल). छाती (Chest - फक्त मुलांसाठी): छातीचे घेर किमान ७७ सेमी आणि ती ५ सेमी फुगवता आली पाहिजे. (मुलींसाठी फक्त ५ सेमी छाती फुगवता येण्याची क्षमता तपासली जाईल). मुले: १.६ किमी धावणे (७ मिनिटांच्या आत), १० पुश-अप्स, १० सिट-अप्स आणि २० स्कॉट्स. मुली: १.६ किमी धावणे (८ मिनिटांच्या आत), १० सिट-अप्स आणि १५ स्कॉट्स. मुली: १.६ किमी धावणे (८ मिनिटांच्या आत), १० सिट-अप्स आणि १५ स्कॉट्स. |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | सायन्स केलेल्या उमेदवारास (Science Subjects)मान्यताप्राप्त बोर्डातून फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि इंग्लिश विषयांसह १२ वी (10+2) उत्तीर्ण. (एकूण किमान ५०% गुण आणि इंग्रजी विषयात स्वतंत्र ५०% गुण असणे आवश्यक आहे). |
| 2 | इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक हामेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, आयटी अशा शाखांमधून ३ वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| 3 | व्होकेशनल कोर्स उत्तीर्णफिजिक्स आणि मॅथ्ससह विषया सह २ वर्षांचा व्होकेशनल कोर्स किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. |
| 4 | इतर सर्व शाखांचे विद्यार्थी (Other than Science)आर्ट्स, कॉमर्स किंवा कोणत्याही शाखेतून १२ वी (10+2) उत्तीर्ण असलेले उमेदवार ही पात्र ठरू शकतात पण किमान ५०% गुणांसह (इंग्रजी विषयात स्वतंत्र ५०% गुणा सह उत्तीर्ण झालेला असावा ). |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• (ऑनलाईन परीक्षा): वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा २२ आणि २३ सप्टेंबर २०२६ रोजी होईल. यामध्ये सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ६० मिनिटांचा पेपर असेल (फिजिक्स
• मॅथ्स
• इंग्रजी). इतर शाखेतील उमेदवारास ४५ मिनिटांचा पेपर असेल व (इंग्रजी
• रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस - RAGA) असेल.
मैदानी चाचणी): ऑनलाईन परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची फिजिकल फिटनेस टेस्ट आणि अडॅप्टॅबिलिटी टेस्ट घेतली जाईल
(वैद्यकीय तपासणी): सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावर वायुसेनेच्या मेडिकल टीमकडून सविस्तर आरोग्य तपासणी केली जाईल.
[ अंत्यंत महत्वाची टीप: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल].
आवश्यक कागदपत्रे
• १० वी बोर्डाचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (नाव आणि जन्मतारीख पडताळण्याकरिता). १२ वी / डिप्लोमा / व्होकेशनल कोर्स पूर्ण केलेले मूळ गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. पासपोर्ट आकाराचा अलीकडील रंगीत फोटो उमेदवाराची सही आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) किंवा एअरफोर्स कर्मचाऱ्यांचे पाल्यांचे प्रमाणपत्र (COAFP). अधिक सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात पाहू शकता
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• उमेदवाराने एअरफोर्सच्या अधिकृत भरती पोर्टलला भेट द्या.
६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून २६ जुलै २०२६ या तारखे अंतर्गत उमेदवार साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक सुरू होईल. आणि तुम्ही अर्ज करू शकता.
त्यानंतर मिळालेल्या युझर आयडीने लॉगिन करून तुमची शैक्षणिक माहिती
• पत्ता व्यवस्थित भरून घ्या.
फोटो
• सही आणि अंगठ्याचा ठसा स्कॅन करून योग्य साईझमध्ये अपलोड करून घ्या.
शेवटी ऑनलाईन पद्धतीने अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून घ्यायला विसरू नका.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.