तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षेद्वारे ५,७०७ पदांची बंपर भरती; ५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज!
सरकारी नोकरी
नमस्कार मित्रांनो मी नोकरीवाला तुमचा मित्र नवीन नोकरीची माहिती घेऊन आलो आहे. नोकरीची ! जर तुम्ही महाराष्ट्रात शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. MPSC द्वारे 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६' ची मूळ जाहिरात (जाहिरात क्र. ०१७/२०२६) २५ जून २०२६ रोजी २,६१९ जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु आता नव्या शुद्धिपत्रकानुसार यामध्ये तब्बल ३,०८८ नवीन पदांची भर पडली असून, आता ही भरती एकूण ५,७०७ जागांसाठी राबवली जात आहे! या सुधारित भरतीमध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI), उद्योग निरीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या मेगा भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून आता ०५ ऑगस्ट २०२६ पर्यंत तुम्हाला ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. तुम्ही जर पदवीधर असाल किंवा पदविका (Diploma) पूर्ण केली असेल, तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत सरकारी अधिकारी बनण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या लेखामध्ये मी तुम्हाला या MPSC गट-क भरतीबाबतची संपूर्ण माहिती—जसे की नवीन पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षेचा टप्पा आणि अर्ज कसा करायचा हे या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत. कृपया हा लेख पूर्ण वाचून घ्या जणे करून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | ५७०७ |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण महाराष्ट् |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | ५ ऑगस्ट २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | वयोमर्यादा गणण्याचा मुख्य दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ किंवा ०५ ऑगस्ट २०२६ (पदानुसार नियमानुसार) धरला जाईल. (Open Category): किमान १८ ते १९ वर्षे, कमाल ३८ वर्षे मागासवर्गीय / EWS: कमाल ४३ वर्षे (५ वर्षांची सवलत) अधिक महितीकरिता मूळ जाहिरात पहावी |
| वेतन श्रेणी / मानधन | ₹१९,९०० ते ₹१,२२,८०० (S-6 ते S-14 स्तर) + सरकारी भत्ते |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | १. तलाठी, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, तांत्रिक सहाय्यकसांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Degree in Any Discipline) पूर्ण असणे अनिवार्य आहे. |
| 2 | २. लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist)कोणत्याही शाखेतील पदवी (Degree). टंकलेखन अर्हता: मराठी टंकलेखन किमान ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन किमान ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (GCC/Computer Typing) उत्तीर्ण. |
| 3 | ३. कर सहाय्यक (Tax Assistant)कोणत्याही शाखेतील पदवी (Degree). टंकलेखन अर्हता: मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. दोन्ही प्रमाणपत्रे आवश्यक. |
| 4 | ४. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)S.S.C. (१० वी) उत्तीर्ण. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile Engineering) किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) मधील किमान ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवी (Degree). इतर अटी: हलके व जड वाहन चालवण्याचा वैध परवाना (Driving License) + शारीरिक पात्रता (पुरूष: उंची १६३ सेमी; महिला: उंची १५५ सेमी, वजन ४५ किग्रॅ). |
| 5 | ५. उद्योग निरीक्षक (Industry Inspector)इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी (Civil/Architectural सोडून) मधील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील (B.Sc.) पदवी. |
| 6 | ६. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक)मत्स्यविज्ञान विषयातील पदवी (B.F.Sc.) किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• संयुक्त पूर्व परीक्षा (Combined Prelims Exam) मुख्य परीक्षा (Mains Exam) टंकलेखन / कागदपत्र पडताळणी
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• Step 1: MPSC च्या ऑनलाईन जिथे अर्ज केले जातात पोर्टलला (mpsconline.gov.in) भेट द्या.
Step 2: नवीन उमेदवार असल्यास रजिस्ट्रेशन करून प्रोफाइल (Profile) तयार करा किंवा जुने खाते असल्यास लॉग इन करा.
Step 3: प्रोफाइलमधील 'KYC' प्रक्रिया पूर्ण करा व तुमची सर्व वैयक्तिक
• शैक्षणिक व आरक्षणाची माहिती अद्ययावत करा.
Step 4: 'Online Application' पर्यायात जाऊन "महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६" निवडा.
Step 5: तुमचे परीक्षा केंद्र आणि AMVI/इतर पदांचा विकल्प निवडा.
Step 6: विचारलेली आवश्यक प्रमाणपत्रे (उदा. डोमासाईल
• NCL
• क्रीडा/दिव्यांग दाखला) PDF स्वरूपात अपलोड करा.
Step 7: ऑनलाईन पेमेंट पर्याय निवडून Debit Card
• Credit Card
• Net Banking किंवा UPI द्वारे फी भरा.
Step 8: फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर त्याची PDF व पेमेंट पावती डाऊनलोड करून सुरक्षित स्वता जवळ ठेवून द्या.
कृपया अधिक माहिती करिता मूळ जाहिरात ही पाहू शकता.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.