BMC Borivali Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत आर/मध्य विभागातील माता व बालक रुग्णालय, बोरीवली (पूर्व) येथे “ड” संवर्गातील 3 रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी स्थानिक नोंदणीकृत
NGO/स्वयंसेवी संस्थांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत जाहिरातीनुसार सदर पदे बहुउद्देशीय कामगार उपलब्ध करून देण्याच्या कामासाठी आहेत. अर्जाचा नमुना माता व बालक रुग्णालय, बोरीवली (पूर्व) येथील
कार्यालयातून 16 सप्टेंबर 2026 पासून सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळणार आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1:30 वाजेपर्यंत आहे. ही प्रक्रिया वैयक्तिक उमेदवारांऐवजी स्थानिक नोंदणीकृत NGO
संस्थांसाठी आहे.
ड” संवर्गातील पदे: 03
शैक्षणिक पात्रता:
अधिकृत जाहिरातीत पहावी.
वयोमर्यादा:
18 ते 38 वर्षे.