भारतीय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागात 'ज्युनियर कोर्ट अटेंडंट' (Junior Court Attendant -
Group 'C' Non-Clerical) पदांच्या एकूण १३० रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी १० वी पास ते १२ वी (10th/12th) पर्यंत शिक्षण घेतलेले पात्रधारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे
ऑनलाइन असणार असून, इच्छुक उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ४ नोव्हेंबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या मुदती पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार असून,
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध असणार आहेत. या लेखा अंतर्गत वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन, परीक्षा पॅटर्न आणि अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Junior Court Attendant: १३०
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेमधून किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण
१० वी ते १२ वी पर्यंत शिकलेले उमेदवार या पदासाठी पात्र आहेत
Objective Type Test (वस्तुनिष्ठ परीक्षा): बहुपर्यायी प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा. Interview (मुलाखत): लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत. Document Verification (दस्तऐवज पडताळणी):
कागदपत्रांची छाननी. Medical Examination / Final Merit List: वैद्यकीय तपासणी व अंतिम गुणवत्ता यादी.
वयोमर्यादा:
१८ वर्षे ते २७ वर्षे
SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट