agniveervayu bharti 2026 (Indian Air Force) अंतर्गत अग्निवीरवायु पदाची भरती
🔥 एकूण जागा: (एकूण पदे प्रसिध्द केलेले नाही)
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

देशसेवेची आवड असणाऱ्या आणि आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या सर्व तरुण मित्र-मैत्रिणींसाठी एक नंबर कडक संधी आली आहे! भारतीय वायु सेना {Indian Air Force} अंतर्गत अग्नीवीरवायू {Agniveervayu Intake 02/2027}

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

पदांसाठी नवीन मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे यामध्ये अविवाहित मुले आणि मुली दोघेही अर्ज करू शकतात! जर तुमचे वय आणि शिक्षण या अटींमध्ये बसत असेल, तर देशाची सेवा करण्याची ही

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

सुवर्णसंधी अजिबात सोडू नका . या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगाराचे पॅकेज आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, याचा संपूर्ण सोपा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे. शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच संपूर्ण माहिती वाचा आणि त्वरित

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

अर्ज करा ! अर्जदार हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो अर्ज करण्याची अंतिम मुदत ही [26 जुलै 2026] आहे तरी पत्रधारक उमेदवाराने अंतिम मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्या

💼 पदाचे नाव व तपशील

अग्निवीरवायु

🎓 पात्रता निकष (1/4)

शैक्षणिक पात्रता:
सायन्स केलेल्या उमेदवारास (Science Subjects): मान्यताप्राप्त बोर्डातून फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि इंग्लिश विषयांसह १२ वी (10+2) उत्तीर्ण. (एकूण किमान ५०% गुण आणि इंग्रजी विषयात स्वतंत्र ५०% गुण असणे आवश्यक

🎓 पात्रता निकष (2/4)

शैक्षणिक पात्रता:
आहे). इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक हा : मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, आयटी अशा शाखांमधून ३ वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्होकेशनल कोर्स

🎓 पात्रता निकष (3/4)

शैक्षणिक पात्रता:
उत्तीर्ण: फिजिक्स आणि मॅथ्ससह विषया सह २ वर्षांचा व्होकेशनल कोर्स किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. इतर सर्व शाखांचे विद्यार्थी (Other than Science): आर्ट्स, कॉमर्स किंवा कोणत्याही शाखेतून १२ वी (10+2) उत्तीर्ण

🎓 पात्रता निकष (4/4)

शैक्षणिक पात्रता:
असलेले उमेदवार ही पात्र ठरू शकतात पण किमान ५०% गुणांसह (इंग्रजी विषयात स्वतंत्र ५०% गुणा सह उत्तीर्ण झालेला असावा ).

📝 परीक्षा स्वरूप (1/4)

(ऑनलाईन परीक्षा): वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा २२ आणि २३ सप्टेंबर २०२६ रोजी होईल. यामध्ये सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ६० मिनिटांचा पेपर असेल (फिजिक्स, मॅथ्स, इंग्रजी). इतर शाखेतील

📝 परीक्षा स्वरूप (2/4)

उमेदवारास ४५ मिनिटांचा पेपर असेल व (इंग्रजी, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस - RAGA) असेल. मैदानी चाचणी): ऑनलाईन परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची फिजिकल फिटनेस टेस्ट आणि अडॅप्टॅबिलिटी टेस्ट घेतली

📝 परीक्षा स्वरूप (3/4)

जाईल (वैद्यकीय तपासणी): सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावर वायुसेनेच्या मेडिकल टीमकडून सविस्तर आरोग्य तपासणी केली जाईल. [ अंत्यंत महत्वाची टीप: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग

📝 परीक्षा स्वरूप (4/4)

असेल].

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
उमेदवाराचा जन्म ०१ जुलै २००५ ते ०१ जानेवारी २०१० या दोन्ही तारखांच्या दरम्यान झालेला असावा (या दोन्ही तारखा धरून). भरतीचे सर्व टप्पे पार पाडून अंतिम निवडीच्या वेळी उमेदवाराचे कमाल वय २२ वर्षे असावे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 26 जुलै 2026