BEST Bus Conductor Recruitment 2026: बेस्ट उपक्रमात 'बस वाहक' पदांसाठी ३६४ जागांची सरळसेवा भरती जाहीर; फक्त १० वी पास उमेदवारांना मुंबईत सरकारी नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज सुरू त्वरित अर्ज करा!
🔥 एकूण जागा: 364
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/5)

बेस्ट बस वाहक भरती २०२६ (BEST Bus Conductor Bharti 2026): मुंबईतील सुप्रसिद्ध 'बेस्ट उपक्रमा'मध्ये (BEST Undertaking) करिअर करू इच्छिणाऱ्या आणि केवळ १० वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी शासकीय

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/5)

अपडेट समोर आली आहे. बेस्ट उपक्रमाद्वारे 'बस वाहक' (Bus Conductor) या पदावरील एकूण ३६४ रिक्त जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/5)

जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/5)

उपलब्ध झाली आहे. बस वाहक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची तारीख ०८ जुलै २०२६ ते २९ जुलै २०२६ पर्यंत ठेवण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी (CBT) परीक्षेच्या गुणांच्या आधारे

📌 भरतीबद्दल थोडक्यात (5/5)

केली जाईल. या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील, वयोमर्यादा, शारीरिक निकष आणि शैक्षणिक अटी खालीलप्रमाणे आहेत खाली दिलेलल्या माहिती नकी उपयोगी पडेल.

💼 पदाचे नाव व तपशील

Bus Conductor: 364

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C. / १० वी) किंवा तत्सम परीक्षा सरासरी किमान ५० टक्के किंवा अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इयत्ता १० वी किंवा त्यापुढील उच्चतम परीक्षेत किमान १०० / ५० गुणांचा 'मराठी' विषय (निम्नस्तर

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
किंवा उच्चस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असणे बंधनकारक आहे. . प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नूतनीकरण केलेला वैध 'बसवाहक परवाना' (Conductor License) आणि बिल्ला (Badge) असणे आवश्यक आहे.

📝 परीक्षा स्वरूप

बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी (CBT) स्वरूपाची असेल. परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, आणि भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी) या विषयांचा समावेश असेल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
किमान वय: उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय: ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वय: ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 29 जुलै 2026