Indian Army NCC Special Entry 2026 भारतीय सैन्यात अधिकारी (Officer) म्हणून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अतिशय मोठी आणि अभिमानाची संधी उपलब्ध झाली आहे. Indian Army ने NCC मधून Special Entry
Scheme 125th Course (April 2027) अंतर्गत Short Service Commission (SSC) साठी अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती विशेषतः NCC 'Certificate धारक पदवीधर उमेदवारांसाठी करण्यात येणार आहे. जर तुम्ही NCC मध्ये
उत्कृष्ट कामगिरी केली असेल आणि भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारासाठी , ही संधी अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची ठरू शकते. भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून निवड होणे म्हणजे केवळ सरकारी
नोकरी मिळणे नव्हे, तर देशासाठी जबाबदारीने काम करण्याची, नेतृत्व कौशल्य विकसित करण्याची आणि सन्मानाचे जीवन जगण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना Officer Training Academy (OTA), Chennai येथे 49
आठवड्यांचे प्री-कमिशन प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना Short Service Commission प्रदान करण्यात येईल. या लेखामध्ये Indian Army NCC Special Entry 2026 संदर्भातील रिक्त जागा,
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, प्रशिक्षण, पगार, निवड प्रक्रिया, अर्जाची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखा यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर तुम्ही हा परी पूर्ण वाचून अर्ज करावा आणि या लेखामध्ये जाहिरात
पण दिली गेली आहे तर जाहिरात पण वाचून घ्यावी नंतर तुम्हास अर्ज करण्यास कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही.
Short Service Commission (Officer), NCC Special Entry (Men): 70 , NCC Special Entry (Women): 06
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी (Graduation) उत्तीर्ण केलेली असावी उमेदवाराकडे NCC Senior Division/Wing चे 'C' Certificate असणे आवश्यक
लेखी परीक्षा घेतली जाणार नाही Services Selection Board (SSB) Interview घेतला जाईल आणि Medical Examination) केली जाईल
वयोमर्यादा:
उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2008 या तारखे अंतर्गत उमेदवारांचे वय 19 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.