भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सैन्याने '10+2 तांत्रिक प्रवेश योजना - 57' (TES-57) जुलै 2027 सत्रांतर्गत भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीमार्फत
अविवाहित पुरुष उमेदवारांकडून एकूण ९० रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) विषयात किमान ६०% गुण प्राप्त करून १२ वी उत्तीर्ण आणि जेईई मेन्स (JEE Mains 2026) परीक्षा
दिलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, इच्छुक उमेदवारांना १४ ऑक्टोबर २०२६ ते १२ नोव्हेंबर २०२६ या मुदती पूर्वी भारतीय सेना अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. निवड झालेल्या
उमेदवारांना ४ वर्षांचे मोफत अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि यशस्वी पूर्ततेनंतर थेट 'लेफ्टिनेंट' पदावर स्थायी कमीशन दिले जाणार असून आकर्षक वेतन व भत्ते मिळतील. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा
याची सविस्तर माहिती या लेखाअंतर्गत दिली आहे.
10+2 Technical Entry Scheme (TES-57) Course: 90
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त शिक्षण बोर्डातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) विषयांसह किमान ६०% गुणांसह १२ वी (10+2) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व उमेदवाराने JEE (Mains) 2026 ची परीक्षा दिलेली असणे बंधनकारक
शैक्षणिक पात्रता:
आहे.
Shortlisting of Applications: जेईई मेन्स स्कोअर किंवा १२ वीच्या गुणांच्या आधारावर अर्जांची शॉर्टलिस्टिंग. SSB Interview (सेवा चयन बोर्ड): ५ दिवसांची खडतर दोन टप्प्यांची मुलाखत परीक्षा (प्रयागराज,
भोपाल, बेंगलुरु किंवा जालंधर येथे). Medical Examination: एसएसबी शिफारस केलेल्या उमेदवारांची जवळच्या सैनिकी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी. Merit List & Joining Letter: एसएसबी मधील गुणांच्या
आधारावर अंतिम गुणवत्ता यादी तयार करून प्रशिक्षण केंद्रासाठी ज्वाइनिंग लेटर दिले जाईल.
वयोमर्यादा:
०१ जुलै २०२७ रोजी उमेदवाराचे वय १६½ ते १९½ वर्षांच्या दरम्यान असावे.