नमस्कार मित्रांनो मी नोकरीवाला तुमचा मित्र नवीन नोकरीची माहिती घेऊन आलो आहे. नोकरीची ! जर तुम्ही महाराष्ट्रात शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून
(MPSC) एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. MPSC द्वारे 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६' ची मूळ जाहिरात (जाहिरात क्र. ०१७/२०२६) २५ जून २०२६ रोजी २,६१९ जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु
आता नव्या शुद्धिपत्रकानुसार यामध्ये तब्बल ३,०८८ नवीन पदांची भर पडली असून, आता ही भरती एकूण ५,७०७ जागांसाठी राबवली जात आहे! या सुधारित भरतीमध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन
निरीक्षक (AMVI), उद्योग निरीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या मेगा भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून
आता ०५ ऑगस्ट २०२६ पर्यंत तुम्हाला ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. तुम्ही जर पदवीधर असाल किंवा पदविका (Diploma) पूर्ण केली असेल, तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत सरकारी अधिकारी बनण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या
लेखामध्ये मी तुम्हाला या MPSC गट-क भरतीबाबतची संपूर्ण माहिती—जसे की नवीन पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षेचा टप्पा आणि अर्ज कसा करायचा हे या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत. कृपया हा लेख पूर्ण वाचून घ्या
जणे करून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) गट-क : १५३९ , लिपिक-टंकलेखक (विविध विभाग): ३०९७ , सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) गट-क: ४६१ , कर सहाय्यक (Tax Assistant) गट-क : २८२ , सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक):२५४ ,
वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल: ११ , सहाय्यक अधीक्षक गट-क: ११ , उद्योग निरीक्षक गट-क: ९ , तांत्रिक सहाय्यक (विमा संचालनालय): 03
शैक्षणिक पात्रता:
१. तलाठी, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, तांत्रिक सहाय्यक: सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Degree in Any Discipline) पूर्ण असणे अनिवार्य आहे.
२. लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist): कोणत्याही शाखेतील पदवी
शैक्षणिक पात्रता:
(Degree). टंकलेखन अर्हता: मराठी टंकलेखन किमान ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन किमान ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (GCC/Computer Typing) उत्तीर्ण.
३. कर सहाय्यक (Tax Assistant): कोणत्याही शाखेतील पदवी
शैक्षणिक पात्रता:
(Degree). टंकलेखन अर्हता: मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. दोन्ही प्रमाणपत्रे आवश्यक.
४. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) : S.S.C. (१० वी) उत्तीर्ण. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile
शैक्षणिक पात्रता:
Engineering) किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) मधील किमान ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवी (Degree). इतर अटी: हलके व जड वाहन चालवण्याचा वैध परवाना (Driving License) + शारीरिक पात्रता (पुरूष: उंची १६३
शैक्षणिक पात्रता:
सेमी; महिला: उंची १५५ सेमी, वजन ४५ किग्रॅ).
५. उद्योग निरीक्षक (Industry Inspector): इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी (Civil/Architectural सोडून) मधील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील (B.Sc.) पदवी.
६. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास
शैक्षणिक पात्रता:
अधिकारी (तांत्रिक): मत्स्यविज्ञान विषयातील पदवी (B.F.Sc.) किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक.
संयुक्त पूर्व परीक्षा (Combined Prelims Exam) मुख्य परीक्षा (Mains Exam) टंकलेखन / कागदपत्र पडताळणी
वयोमर्यादा:
वयोमर्यादा गणण्याचा मुख्य दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ किंवा ०५ ऑगस्ट २०२६ (पदानुसार नियमानुसार) धरला जाईल.
(Open Category): किमान १८ ते १९ वर्षे, कमाल ३८ वर्षे
मागासवर्गीय / EWS: कमाल ४३ वर्षे (५ वर्षांची सवलत)
अधिक
वयोमर्यादा:
महितीकरिता मूळ जाहिरात पहावी