भारतीय नौदलाच्या (Ministry of Defence - Navy) अंतर्गत येणाऱ्या 'नेव्हल शिप रिपेअर यार्ड' (NSRY), श्री विजय पुरम (अंदमान व निकोबार) येथे अप्रेंटिस (IT-03 Batch 2026-27) पदांसाठी भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयटीआय
(ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी एकूण ५० जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता आणि अर्जाची करण्याची पद्धत सविस्तर या लेखामध्ये दिली गेली आहे अंतिम मुदत संपण्या पूर्वी अर्ज करा.
टेक्निशियन (व्होकेशनल) अप्रेंटिस: 50
शैक्षणिक पात्रता:
१० वी (Matriculation/SSC) परीक्षा उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण असावे.
प्राथमिक गुणवत्ता यादी (Shortlisting / Preliminary Merit List): उमेदवारांनी १० वी (SSC/Matriculation) आणि ITI मध्ये मिळवलेल्या एकूण टक्केवारीच्या (Aggregate Percentage) आधारावर प्राथमिक गुणवत्ता
यादी तयार केली जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे मुलाखतीचे निमंत्रण पत्र (Call Letter) पाठवले जाईल. मुलाखत आणि तांत्रिक कौशल्य चाचणी (Interview & Technical Skill Test): ठिकाण:
अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल (ATS), नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY), श्री विजय पुरम. एकूण गुण (Total Marks): ५० गुण (50 Marks).
वयोमर्यादा:
१८ वर्षे (ट्रेनिंग सुरू होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत पूर्ण असले पाहिजे.