NCL Recruitment 2026: नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये 'मायनिंग सिरदार' आणि 'सर्वेअर' पदांची मेगा भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज सुरू!
🔥 एकूण जागा: 259
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

सरकारी क्षेत्रात सन्मानाची आणि कडक पगाराची नोकरी शोधणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी [नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL)] या मिनीरत्न कंपनीकडून मोठी सुवर्णसंधी आली आहे. कोल इंडिया लिमिटेडची अनुषंगी कंपनी असलेल्या

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

एनसीएल द्वारे [मायनिंग सिरदार (Mining Sirdar)] आणि [सर्वेअर (Surveyor - मायनिंग)] या वैधानिक पदांवर नियमित (Regular) नियुक्तीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत एकूण [{२५९ जागा}] भरल्या

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना मध्य प्रदेशातील सिंग्रोली आणि उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोळसा खाणींमध्ये थेट सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी [०५ ऑगस्ट २०२६]

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

या अंतिम तारखेपूर्वी आपला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे

💼 पदाचे नाव व तपशील

मायनिंग सरदार : २५४ , मायनिंग सर्व्हेयर : ०५

🎓 पात्रता निकष (1/4)

शैक्षणिक पात्रता:
१. मायनिंग सिरदार (ट्रेड 'C'): कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी (Matriculate) उत्तीर्ण. सोबत DGMS कडून मिळालेले वैध मायनिंग सिरदारशिप कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र (Mining Sirdarship Certificate of Competency), वैध गॅस

🎓 पात्रता निकष (2/4)

शैक्षणिक पात्रता:
टेस्टिंग प्रमाणपत्र (Gas Testing Certificate) आणि फर्स्ट एड प्रमाणपत्र (First Aid Certificate) असणे आवश्यक. किंवा १० वी उत्तीर्ण सोबत मायनिंग इंजिनिअरिंगमधील पदवी/डिप्लोमा (Degree/Diploma in Mining) आणि वैध ओव्हरमॅन

🎓 पात्रता निकष (3/4)

शैक्षणिक पात्रता:
कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र (Overman Competency), वैध गॅस टेस्टिंग व फर्स्ट एड प्रमाणपत्र असावे. २. सर्वेअर (मायनिंग) (ट्रेड 'B'): किमान १० वी उत्तीर्ण सोबत DGMS कडून मिळालेले वैध सर्वेअर कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र (Surveyors'

🎓 पात्रता निकष (4/4)

शैक्षणिक पात्रता:
Certificate of Competency). किंवा मायनिंग/मायन सर्वेअरिंग इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा (Degree/Diploma in Mining/Mine Surveying) आणि वैध सर्वेअर कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

एकूण गुण: १०० गुणांची संगणक आधारित परीक्षा (CBT) ९० मिनिटांची असेल. परीक्षेचे दोन भाग: सेक्शन 'A' मध्ये तांत्रिक विषयावर ७० प्रश्न (७० गुण) असतील आणि सेक्शन 'B' मध्ये जनरल नॉलेज, रिझनिंग, मॅथ्स यावर

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

३० प्रश्न (३० गुण) असतील. परीक्षेत कोणतीही नेगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) नाही.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे (वय हे०५ ऑगस्ट २०२६ रोजी मोजले जाईल).

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 5 ऑगस्ट 2026