*अहमदनगर अंगणवाडी मदतनीस भरती २०२६ (Ahilyanagar Anganwadi Bharti 2026):* महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत शासन निर्णयानुसार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत *बाल विकास प्रकल्प अधिकारी
(नागरी) अहिल्यानगर पश्चिम (अहमदनगर पश्चिम)* या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या श्रीरामपूर नगरपालिका तसेच नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांसाठी *अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Madatnis)* या मानधनी पदांची सरळ
नियुक्तीने (By Nomination) मोठी कडक भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत केवळ पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय
मानधनावर अंगणवाडी क्षेत्रात काम करून आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्णसंधी आहे. या भरतीची कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नसून, उमेदवारांची निवड पूर्णपणे त्यांच्या १२
वीच्या आणि पुढील उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता गुणांच्या आधारावर (Primary Merit List) थेट केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून अंतिम तारखेपूर्वी आपला
अर्ज दिलेल्या पत्त्यावर समक्ष किंवा पोस्टाद्वारे सादर करावा. उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे तात्काळ खालील सविस्तर माहिती पत्रक तपासून घ्या भाऊ. अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत
आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2026 आहे .
अंगणवाडी मदतनीस: 03
शैक्षणिक पात्रता:
अंगणवाडी मदतनीस या पदासाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही 12 वी पास उतीर्ण असणे आवश्यक आहे.
कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही शैक्षणिक पात्रते वरती आणि कागद पत्र पडताळणी वरती उमेदवाराची निवड केली जाईल.
वयोमर्यादा:
* उमेदवाराचे कमीत कमी वय *१८ वर्षे* .व जास्तीत जास्त वय 35 वर्ष पाहिजे .
विधवा महिला उमेदवारासाठी 40 वर्षाची ठेवण्यात आली आहे